बिटकॉईनमधून बक्कळ कमाईचं दाखवलं आमिष, कोल्हापुरातील तरुणाला 16 लाखांना लुबाडलं

belgavkar.com | belgaum | belgavkar

मागील काही काळापासून क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणि शेअर मार्केटमध्ये (Stock market) गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक (Fraud) केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अलीकडेच बार्शीतील विशाल फटे प्रकरण राज्यभर गाजत आहे. असं असताना आता कोल्हापुरातून एक नवीन फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे. येथील एका तरुणाला बिटकॉईनमध्ये गुंतवणूक (Investment in bitcoin) करायला लावून त्याला 16 लाखांना लुबाडलं आहे. संबंधित तरुणाने या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सहा जणांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
हिरेन पाटील (रा. अमरावती), मोहमद हबीब मोहमद हनीफ, मोहमदी बेगम जुनैदी (दोघेही रा. गुलबर्गा, कर्नाटक), मोहमद आब्बास मोहमद युसुफ, हरजैत कौर ऊर्फ जोया युसूफ फारूकी (दोघे रा. अहमदगड, पंजाब), राकेश कुमार शीमंगलरामजी (रा. नई आबादी, मध्य प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहे. या प्रकरणी हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील प्रवीण प्रकाश माळी (35) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित आरोपींनी कोल्हापुरातील विविध हॉटेलमध्ये ट्रेडिंगबाबत मिटिंग घेऊन लोकांना बक्कळ कमाईचं आमिष दाखवलं होतं. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेलं असं सांगून आरोपींनी अनेकांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. दरम्यान आरोपींनी फिर्यादी माळी यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि बँक खात्याद्वारे 16 लाख 16 हजार रुपये घेतले होते. फिर्यादीनं यातील काही रक्कम आपल्या नातेवाईकांकडून घेऊन आरोपींना दिली होती. पण पैसे घेतल्यानंतर आरोपींनी आश्वासनाची पूर्तता केली नाही. शिवाय गुंतवणुकीसाठी वापरलेली वेबसाईट अचानक बंद केली. तसेच गुंतवणूकदारांची  मुद्दलही परत न करता त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते आजपर्यंत घडला आहे. या प्रकरणी प्रवीण माळी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बिटकॉईनमधून बक्कळ कमाईचं दाखवलं आमिष, कोल्हापुरातील तरुणाला 16 लाखांना लुबाडलं

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm