बेळगाव : बेळवट्टी ग्रामपंचायतीवर अखेर समितीचा भगवा फडकलाचं

बेळगाव : बेळवट्टी ग्रामपंचायतीवर अखेर समितीचा भगवा फडकलाचं

belgavkar.com | belgaum | belgavkar

अध्यक्षपदी समितीचे म्हाळू नारायण मजूकर यांची निवड

बेळगाव : ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आणि बोकनूर गावचे म्हाळू नारायण मजूकर यांची चुरशीच्या निवडणुकीत अवघ्या एक मतांनी बाजी मारली. तर उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार महादेवी परशराम मेदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बेळवट्टी ग्रामपंचायतीवर समितीचा भगवा फडकविण्यासाठी आठवडाभर प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले आणि पार पडलेल्या बेळवट्टी ग्रामपंचायत निवडणुकीत समितीने बाजी मारली.
या बेळवट्टी ग्रामपंचायती अंतर्गत बेळवट्टीसह बाकनूर, बडस व धामणे अशी चार गावं येतात. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 11 आहे. आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत म्हाळू नारायण मजूकर यांनी बाजी मारली पण अवघ्या एक मताने. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर 6 विरुद्ध 5 अशा मतांनी विजय मिळविला. सदस्य विठ्ठल रामचंद्र पाटील, अनुराधा कृष्णा कांबळे, रेश्मा निंगो कुलम, रेणुका प्रकाश सुतार व रूपा रवळनाथ सुतार यांनी समितीची शान राखल्यानेच या ग्रामपंचायतीवर भगवा फडकला. बेळवट्टीच्या महादेवी परशराम मेदार उपाध्यक्ष पदाच्या एकमेव उमेदवार असल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बेळवट्टी ग्रामपंचायतीवर अखेर समितीचा भगवा फडकलाचं
अध्यक्षपदी समितीचे म्हाळू नारायण मजूकर यांची निवड

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm