बेळगाव : अबनाळी ग्रामस्थांची 7 किमीची पायपीट वाचली

बेळगाव : अबनाळी ग्रामस्थांची 7 किमीची पायपीट वाचली

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव - खानापूर : अबनाळी ग्रामस्थांना सरकारी रेशनचे धान्य मिळवण्यासाठी खानापूर येथील जंगलातून 7 कि. मी ची पायपीट करावी लागत होती. भाजप बेळगाव ग्रामीण महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांनी रेशन पुरवठा सलग दुसऱ्यांदा थेट गावात केला. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. सातत्याने केल्या जाणाऱ्या विनंतीवरून भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या नियती फौंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला आहे.
दुर्गम भागात असलेल्या अबनळी गावकऱ्यांचे जीवनावश्यक साहित्य अभावी हाल होत असल्याने त्यांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा गावातचं करावा अशी विनंती गावकर्‍यांसह ग्रा. पं. सदस्य महादेव शिवुलकर हे सातत्याने करत होते. त्याची दखल घेऊन डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या नियती फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांना शासकीय रेशनचे वितरण केले. याप्रसंगी महादेव शिवुलकर, अबनळी गावचे पंच बुधाप्पा गांवकर, नामदेव गांवकर, नारायण गांवकर, दत्तू गांवकर, भाजपचे बसवराज कडेमनी, ईश्वर सानिकोप, बाळेश चन्नणावर, कुशल अंबोजी, मंजुनाथ नलवडे, महेश गुरव, राजश्री आजगांवकर, पारिश्वाड भाजप शक्तीकेंद्र प्रमुख विठ्ठल निडगलकर आदींसह अबनळी ग्रामस्थ उपस्थित होते. प्राथमिक शाळेच्या शिक्षिका विजया पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अबनाळी ग्रामस्थांची 7 किमीची पायपीट वाचली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm