बेळगाव : समिती पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा

बेळगाव : समिती पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये 'विधानसौध' इथं घ्यायला सुरूवात केली आहे. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ठ असल्यामुळे कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला इथल्या मराठी भाषिकांचा विरोध आहे. हाच विरोध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सिन डेपो इथं 13 डिसेंबर रोजी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण महापालिका आणि पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी दिली नव्हती. टिळकवाडीतील महामेळाव्यासाठी परवानगी न घेता व्यासपीठ उभारण्याबरोबरच महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास विरोध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून नोटिसा देण्यात आल्या आहेत.
समितीच्या पदाधिकाऱ्यांसह जवळपास 27 जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 30 डिसेंबर 2021 रोजी टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक रस्त्यावर व्यासपीठ उभारले आणि सभा आयोजित केली. त्याचप्रमाणे परवानगी न घेता उभारलेले व्यासपीठ काढा म्हणून सांगण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास विरोध केला असा आरोप ठेवून महापालिकेच्या उपकार्यकारी अभियंता मंजुश्री मंजन्ना यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर भा.द.वि. 143, 283, 341, 353 व 149 कलमान्वये गुन्हे दाखल केले. यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांना सोमवारी सकाळी टिळकवाडी पोलीस ठाण्यात बोलावून नोटिसा देण्यात आल्या. सदर पदाधिकाऱ्यांनी प्रमाणे इतरांनाही पोलीस ठाण्यात बोलावून नोटीसही देण्यात येणार असल्याचे समजते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : समिती पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm