बेळगाव : तरुणाने स्वतःला संपवले

बेळगाव : तरुणाने स्वतःला संपवले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी - कोगनोळी : येथील काशीद गल्लीत भाडोत्री घरात राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. किरण बाळासाहेब देसाई (वय 40, मूळगाव हडलगा, ता. गडहिंग्लज, कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून किरण देसाई आपल्या पत्नीसह कोगनोळीत भाडोत्री घरात राहत होता. त्याने बुदिहाळ येथे स्वतःचा गारमेंट व्यवसाय सुरू केला होता.
किरण देसाई याचे सासर कोगनोळीच असल्याने पत्नी दुपार सत्रात आई-वडिलांच्या घरी गेली होती. त्यामुळे घरी कोणीही नसताना सायंकाळी राहत्या घरात त्याने आत्महत्या केली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळी कोगनोळी पोलिस ठाण्याचे एएसआय एस. ए. कंबार, राजू गोरखनावर यांनी भेट देऊन पाहणी केली. निपाणी महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : तरुणाने स्वतःला संपवले

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm