बेळगाव ता. खानापूर : मांगीनहाळ (ता. खानापूर) येथील नम्रता मल्लापा हणबर (वय 20) ही युवती 18 जानेवारीपासून बेपत्ता झाली आहे. सकाळी खानापूरला शिवन क्लासला जाऊन येते, असे सांगून गेली ती अद्याप परत आली नाही.
तिला कन्नड आणि मैथिली भाषा अवगत आहे. लाल रंगाचा चुडीदार परिधान केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. तिच्याबाबत अधिक माहिती मिळाल्यास खानापूर पोलिसांशी 08336-222333 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.