हुडहुडी...! थंडीच्या कडाक्याने बेळगावकर गारठले; पारा कमालीचा घसरला

हुडहुडी...!
थंडीच्या कडाक्याने बेळगावकर गारठले;
पारा कमालीचा घसरला

belgavkar.com | belgaum | belgavkar

कमाल तापमान 25.4 अंश सेल्सिअस

बेळगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अन् शनिवारपासून पाकिस्तानात उठलेल्या धुळीच्या वादळाने रविवारी गुजरातच्या दिशेने सुरू केलेले मार्गक्रमण यामुळे वातावरणात या चार दिवसात कमालीचा बदल झाला आहे. या बदलाने बेळगावकरदेखील आश्चर्यचकित झाले. रविवारी दिवसभर नागरिकांना सूर्यदर्शनही दुर्लभ झाले होते. सोमवारी सकाळी उशिराने का होईना, सूर्यदर्शन घडले. तसेच वातावरणातील धुके व धुरक्यांचे प्रमाणही घटले. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. वाऱ्याचा वेग सोमवारी मंदावला होता; मात्र पारा कमालीचा घसरल्याने थंडीची तीव्रता प्रचंड वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला.
सोमवारी सकाळी हवेत आर्द्रता व बाष्पचेही प्रमाण कमी झालेले दिसून आले. अंधुक वातावरणदेखील निवळले होते. बेळगाव शहराच्या हवेच्या गुणवत्तेतदेखील काही प्रमाणात सुधारणा झाली.
बेळगाव शहराचे किमान तापमान 10 अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली आहे. 25 डिसेंबर रोजीसुद्धा पारा 9.1 अंशापर्यंत खाली घसरल्याने बेळगावकर गारठले होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

हुडहुडी...! थंडीच्या कडाक्याने बेळगावकर गारठले; पारा कमालीचा घसरला
कमाल तापमान 25.4 अंश सेल्सिअस

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm