बेळगाव : कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला

बेळगाव : कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेंगळूरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची घटना 17 डिसेंबरला घडल्यावर त्याचे पडसाद बेळगावला उमटले. धर्मवीर संभाजी चौकात याविरुद्ध निदर्शने करण्यात आली होती. या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडली. दगडफेक आणि काही ठिकाणी जाळपोळची घटना घडली. पण आंदोलकांनीच कायदा व सुव्यवस्था बिघडवली. शहरात दंगल पसरवली आणि खासगी व सार्वजनिक मालमत्तेची हानी करण्यात आल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शेळके, उपाध्यक्ष केसरकर यांच्यासह 61 जणांच्या विरोधात कॅम्प व मार्केट पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक आणि खडेबाजार पोलिस ठाण्यात 5 गुन्हे दाखल झाले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आणि उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांना सातव्या व अखेरच्या खटल्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. पाचव्या कनिष्ठ दिवाणी न्यायालयात सशर्त जामीन मंजूर झाला आहे. यामुळे सव्वा महिन्यानंतर कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राजद्रोहासह अन्य स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांचा यात समाविष्ट आहे. त्यापैकी सहा प्रकरणांत जामीन मंजूर झाला होता. पण, कॅम्पमधील गुन्ह्यातून जामीन मंजूर व्हायचा होता. 18 डिसेंबरला उपरोक्त दोघांसह अन्य मराठी भाषिकांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात झाली होती. शेळके, केसरकरांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे 37 दिवसांनी दोघांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला. श्री. शेळके, श्री. केसरकर यांच्यातर्फे अ‍ॅड. महेश बिर्जे, अ‍ॅड. एम. बी. बोंद्रे यांनी काम पाहिले.
पोलिसांनी तयार केलेल्या यादीतील 61 जणांपैकी 38 जणांना अटक केली आहे. उर्वरित 23 जण भूमिगत झाले आहेत. यातील महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष शुभम शेळके व उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांना राजद्रोह आणि 307 गुन्ह्यामध्ये धारवाड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांची सुटका लवकरचं होणार आहे. श्रीराम सेना हिंदूस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर या मराठी भाषिक नेत्यांसह 61 जणांवर 17 डिसेंबरपासून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 38 मराठी भाषिकांचा मुक्काम अजूनही कारागृहातच राहावा, यासाठी विविध पोलीस ठाण्यांत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 38 जणांपैकी रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 36 जणांच्या जामीन अर्जावर सोमवारी उच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ती गुरुवार आता 27 जानेवारी रोजी होणार आहे. सर्व आरोपींची गुन्हा क्र. 88 व 91 मधील शुरिटी प्रक्रिया पार पाडण्यात आली. आता गुरुवार 27 जानेवारी रोजी या 36 जणांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm