news.jpg | बेळगाव : युवती बेपत्ता | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : युवती बेपत्ता

belgavkar.com | belgaum | belgavkar


बेळगाव : दुकानाला जाऊन येते, असे सांगून वाघवडे येथील जोतिबा यल्लाप्पा आंबोळकर यांच्या शेतातील झोपडीतून बाहेर गेलेली युवती बेपत्ता झाली आहे. शनिवारी सायंकाळी सातच्या दरम्यान ती बेपत्ता झाली असून स्नेहा अजय चव्हाण (वय 22, रा. राईखेडा, ता. जिंतूर, जि. परभणी महाराष्ट्र) असे तिचे नाव आहे.
याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिचा सर्वत्र शोध घेऊनही कोठेच थांगपत्ता लागू न शकल्याने स्नेहा बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. तिची उंची 5.3 फूट, गोल चेहरा, गव्हाळी वर्ण, अंगाने सदृढ आहे. तिला मराठी, हिंदी भाषा अवगत आहे. अंगावर लाल रंगाची साडी आणि ब्लाऊज परिधान केला आहे. वरील वर्णनातील महिलेबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याशी (0831-2405252) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.