news.jpg | बेळगाव : जवानाच्या कुटुंबाचे अहोरात्र धरणे आंदोलन | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : जवानाच्या कुटुंबाचे अहोरात्र धरणे आंदोलन

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : घर बांधण्यासाठी रितसर शुल्क अदा करुनही ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या शिरोली ग्राम पंचायतीच्या अनागोंदी कारभाराविरोधात न्याय देण्याच्या मागणीसाठी जवानाच्या एका कुटुंबाने येथील तालुका पंचायत कार्यालयासमोर अहोरात्र धरणे आंदोलन छेडले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सत्तर वर्षाची वृद्ध आई, चार वर्षाची मुलगी आणि पत्नीसह सुशील देसाई यांनी आंदोलन छेडले आहे.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
बामणवाडा-शिरोली येथे सुशील देसाई यांच्या भावाची जागा आहे. सैन्यदलात असलेल्या भावाच्य नावावरील या जागेत 2006 साली ग्राम पंचायतीची रितसर परवानगी घेऊन घ बांधले आहे. त्यासाठी ग्रा.पं.चे बांधकाम शुल्कही अदा करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीला मालमत्ता कराची भरण करण्यात आली आहे. असे असताना इतर कामांसाठी आवश्यक असलेले ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर अद्याप ते देण्यात आलेले नाही. त्यामुळे देसाई कुटुंबाने तालुका पंचायत कार्यालयासमोर अहोरात्र धरणे आंदोलन छेडले आहे.
bjp-dhananjay-jadhav