बापरे...! RRB-NTPC निकालाविरोधात विद्यार्थी आक्रमक; रेल्वेचं इंजिन पेटवलं, पोलिसांवर केली दगडफेक

बापरे...!
RRB-NTPC निकालाविरोधात विद्यार्थी आक्रमक;
रेल्वेचं इंजिन पेटवलं, पोलिसांवर केली दगडफेक

belgavkar.com | belgaum | belgavkar

14 जानेवारी रोजी लागलेल्या आरआरबी एनटीपीसीच्या निकालानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बिहारमधील रेल्वे सेवा कोलमडली आहे. मंगळवारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यानी अनेक ठिकाणी इंजिनला आग लावली, पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारच्या बक्सर, मुझफ्फरपूर, नालंदा, नवादा, सीतामढी आणि आरामध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅक जाम केला होता. पाटणामध्ये पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या तसेच लाठीचार्ज देखील करावा लागला आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागातील आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनजवळील एका पॅसेंजर ट्रेनला आग लावली. विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनवरील पश्चिम गुमटी जवळ उभ्या असलेल्या सासाराम आरा पॅसेंजरच्या इंजिनमध्ये आग लावली. त्यानंतर लोको पायलट रवि कुमारने इंजिनला इतर डब्यांपासून वेगळं केलं आणि त्यानंतर स्वत: चा जीव वाचवण्यासाठी इंजिनमधून उडी मारली. लोको पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रेल्वेचं इंजिन जळून खाक झालं आहे.
परीक्षा पॅटर्नमधील बदल आणि निकालातील गैरप्रकाराविरोधात नाराज विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन करत रेल्वे ट्रॅक जाम केला होता. आंदोलनामुळं संबंधित ट्रॅकवरील वाहतूक बंद झाली होती. यानंतर सासाराम आरा पॅसेंजर ट्रेनला आऊटर जवळ थांबवण्यात आलं होतं. मात्र, विद्यार्थी तिथं पोहोचले आणि त्यांनी ट्रेनच्या इंजिनला आग लावून दिली. यानंतर इंजिन जळून गेलं. सितामढी रेल्वे स्टेशनवर आंदोलनावेळी काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. एएनआयनं जारी केलेल्या व्हिडीओमध्ये विद्यार्थी दगडफेक करत असल्याचं दिसून आलं आहे. नवादा स्टेशनवर यानंतर विद्यार्थ्यांनी दुरुस्तीच्या कामांवर असलेल्या गाडीमध्ये आग लावून दिली. मात्र अग्निशमन दलाने त्या आगीवर नियंत्रण मिळवलं. रेल्वे ट्रॅक जाम झाल्याच्या बातम्या आल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि आरपीएप अधिकारी आणि जवान एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थी यांच्यात थोडा वेळ झटापट झाली. यानंतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शांत केलं. पण ते ऐकायलाच तयार नाहीत. नवादा रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पोलिसांनी अनेकांवर एफआयआर दाखल केली आहे.
 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बापरे...! RRB-NTPC निकालाविरोधात विद्यार्थी आक्रमक; रेल्वेचं इंजिन पेटवलं, पोलिसांवर केली दगडफेक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm