news.jpg | बेळगाव : मच्छेत फॉरेस्ट पार्क विनाशुल्क खुले | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : मच्छेत फॉरेस्ट पार्क विनाशुल्क खुले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव शहरातील जनतेला निसर्गाच्या सानिध्यात वावरता यावे याकरिता साकारलेल्या वन उद्यानाला पुनरूज्जीवन करण्याचे काम वनविभागाने केले आहे. मच्छे येथे तब्बल 50 एकर परिसरात हे वन उद्यान (फॉरेस्ट पार्क) साकारले आहे. या ठिकाणी विविध जातीची झाडे, वॉकिंग ट्रक, लॉन आणि इतर सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना शहराच्या जवळच आता वन उद्यानात भटकंती करता येणार आहे. 26 जानेवारी रोजी या वन उद्यानाचे उदघाटन करून ते सर्वांना खुले केले जाणार आहे, अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
मच्छे येथील साडेतीन एकरामध्ये 1984 मध्ये बाभळीची लागवड करण्यात आली होती. त्यामधील काही झाडे कमी करून आता 50 एकरात नागरिकांसाठी फॉरेस्ट पार्क उभारण्यात आले आहे. या ठिकाणी निसर्गसौंदर्याबरोबर वन्यजीव हवामान आणि वेगवेगळ्या जातीच्या दुर्मिळ वृक्षांची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी व पर्यटकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. याबरोबरच लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य व इतर सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शालेय सहलींचे आयोजन करण्यासाठी फॉरेस्ट पार्क उपयुक्त ठरणार आहे.
bjp-dhananjay-jadhav
या उद्यानात 45 हजार विविध जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये तीन हजार फळझाडे, औषधी वनस्पती आणि मसाल्यांच्या झाडांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी जैव विविधता पाहता येणार आहे. याबरोबर बांबू, चंदन, आंबा, चिंच, जांभूळ, यासह इतर प्रजातीही माहिती होणार आहे. सहा हजार चौरस फुटात लॉन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी वनभोजन, मिटींग व इतर लहान कार्यक्रम करता येणार आहेत. शिवाय या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आल्याने वयोवृद्ध नागरिकांना विश्रांती घेता येणार आहे. याबरोबरच पाण्याच्या टाक्या भारून पर्यटकांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांना वनविभागाच्या उद्यानाचे आकर्षण लागले आहे. शहरापासून अवघ्या दहा किलोमिटरवर साकारलेल्या या फॉरेस्ट पार्कमध्ये वन क्षेत्र आणि इतर सुविधा पुरविण्यात आल्याने नागरिकांना हा पार्क जंगल सफारीच ठरणार आहे. तब्बल 50 एकरात असलेल्या जैव विविधतेची माहिती नागरिकांना या उद्यानाच्या माध्यमातून होणार आहे. नागरिकांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी आणि एक दिवस निसर्गात घालवता यावा. याकरिता वनविभाग येत्या मार्चपर्यंत मोफत प्रवेश देणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे वनउद्यान सर्वांना खुले राहणार आहे.