तिसऱ्या लाटेचा धोका पाहता DGCI कडून औषध विक्रेत्यांना सूचना

belgavkar.com | belgaum | belgavkar


भारतासह जगात सध्या कोरोनाची तिसरी लाट पसरली आहे. त्यामुळे भारतात दररोज हजारो नवी प्रकरणं समोर येतंय. याच पार्श्वभूमीवर ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया यांनी औषधांच्या बड्या विक्रेत्यांसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या देशात कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सरकार पूर्ण खबरदारी घेत आहे.
2 महिन्यांचा औषधांचा साठा तयार करा
औषध कंट्रोलर यांच्याकडून सांगण्यात आलं आहे की, औषध विक्रेत्यांना 2 महिन्यांसाठी औषधाचा साठा तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या औषधांमध्ये ॲरासिटोमॉल, अझिथ्रोमायसीन, अमोक्सिसिलिन, कफ सिरप आणि डॉक्सिसायक्लिन यांचा समावेश आहे. या औषधांचा साठा ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. भारतासह जगात सध्या कोरोनाची तिसरी लाट पसरली आहे. त्यामुळे भारतात दररोज हजारो नवी प्रकरणं समोर येतंय. दरम्यान, नवीन संशोधनात ओमीक्रॉन व्हेरिएंटची काही नवीन लक्षणं समोर आली आहेत. या लक्षाणांवरून असं लक्षात येतंय की, कोरोना आता कान आणि आतड्यांवर परिणाम करतोय.
संशोधनात आढळली नवीन लक्षणं : ओमीक्रॉन व्हेरिएंटवर करण्यात येत असलेल्या संशोधनात नवीन लक्षणे समोर आली आहेत. या व्हेरिएंटमुळे मेंदू, हृदय आणि डोळे तसंच कानांवरही परिणाम होत असल्याचं अभ्यासात आढळून आलं आहे. कानात शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणं, यासोबतच या प्रकाराचा त्रास झालेल्या रुग्णांमध्ये थंडी वाजून येणे यासारखी लक्षणेही दिसून आली आहेत. अहवालानुसार, ज्या रुग्णांमध्ये अशी समस्या दिसली, त्यापैकी बहुतेकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत. कोरोना विषाणूच्या ओमीक्रॉन प्रकारावर संशोधन करणाऱ्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला गेल्या काही दिवसांपासून अचानक कानात दुखणं सुरू झाले असेल, मुंग्या येणं, ऐकू येणं कमी झाले असेल किंवा चक्कर येण सुरू झाले असेल, तर त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे.