news.jpg | एक हसीना अन् दो दिवाने...! प्रेमाच्या त्रिकोणात झाला खळबळजनक मर्डर, लेडी डाॅनमुळे सगळेच हैराण | belgaum news | belgavkar बेळगावकर

एक हसीना अन् दो दिवाने...! प्रेमाच्या त्रिकोणात झाला खळबळजनक मर्डर, लेडी डाॅनमुळे सगळेच हैराण

belgavkar.com | belgaum | belgavkar

19 वर्षीय मुलीचा कारनामा ऐकून भलेभले थरथर कापत होते. रातोरात अटक होऊन ती जेलच्या कोठडीत पोहचली. शहरात एका लेडी डॉनचा एका गँगस्टरवर जीव जडला. त्यानंतर काही दिवसांनी लेडी डॉनला दुसराच गँगस्टर आवडला. या दोघांही गॅगस्टरमध्ये पूर्वीपासून वैमनस्य होतं. त्यात प्रेमात मिळालेला धोका पाहून त्यांची दुश्मनी आणखीच वाढली. काही दिवसानंतर अचानक लेडी डॉननं बाजू पलटली आणि एका गॅगस्टरचा मर्डर झाल्यानं शहरात खळबळ उडाली. 19 वर्षीय मुलीचा कारनामा ऐकून भलेभले थरथर कापत होते. अवघ्या 19 व्या वर्षी या मुलीनं गोळी आणि शिवी यांना जवळ केले होते. रातोरात अटक होऊन ती जेलच्या कोठडीत पोहचली. स्वत:ला राजस्थानची लेडी डॉन म्हणून दावा करणाऱ्या या मुलीने तिच्या प्रियकराला हत्येसाठी उकसवलं.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
तिच्यावर दुसऱ्या गँगच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी आणि फेसबुकवरुन शिवीगाळ करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. या 19 वर्षीय मुलीचं नाव रेखा मीणा असं आहे. आता करौली पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्यात. परंतु त्याआधी रेखा मीणानं काय काय कांड केलेत ते जाणून घेऊया. राजस्थानमध्ये दोन गटाच्या गँगवारमध्ये एका गुंडाचा मृत्यू होतो. या प्रेम कहानीत 3 जणांचा समावेश आहे. सुरुवातीला लेडी डॉन रेखा मीणा, दुसरा गँगस्टर अनुराज मीणा तर तिसरा गँगस्टर पप्पू मीणा हे तिघंही राजस्थानातील असून सर्व गुन्हेगारी क्षेत्राशी निगडीत आहेत. गँगस्टर अनुराज आणि पप्पू एकेकाळी चांगले मित्र होते. दोघांनी एकत्र अनेक गुन्हे केले. परंतु जयपूरमध्ये अनुराजची मुलाखत रेखा मीणासोबत झाली. दोघंही करौली येथील होते. दोघं एकमेकांच्या जवळ आले. अनुराज यानं गुन्हेगारी क्षेत्रात स्वत:चा दबदबा बनवला होता. तर रेखा नुकतीच या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करत होती. परंतु जेव्हा पुढे काही झालं नाही तेव्हा प्रेम कहानीत तिसरा गँगस्टर पप्पू मीणा याची एन्ट्री झाली.
bjp-dhananjay-jadhav
गँगस्टर अनुराज मीणानं रेखाला त्याचा मित्र पप्पूशी ओळख करुन दिली. त्यानंतर पप्पू आणि रेखा एकमेकांच्या जवळ आले. एकेदिवशी पप्पूनं रेखाची फेसबुक पोस्ट शेअर केली. त्यावरुन अनुराजला या दोघांवर संशय येऊ लागला. त्यानंतर अनुराज आणि पप्पू यांच्यात रेखावरुन भांडणं सुरु झाली. परंतु रेखानं संधी मिळताच अनुराजच्या बाजूने गेली. अनुराजचं पहिलं प्रेम रेखा त्याच्या आयुष्यात पुन्हा आली. त्यानंतर तिने पप्पूबद्दल अनुराजला भडकवणं सुरु केले. अखेर या प्रेमाच्या त्रिकोणात रक्तरंजित इतिहास लिहिला गेला. अनुराजनं पप्पूच्या घरावर हल्ला करत गोळ्या झाडून त्याला ठार केले.