news.jpg | Republic Day 2022 : Video - कडक सॅल्यूट! मायनस 40 डिग्री तापमान अन् 15000 फूट उंचीवर जवानांनी फडकवला तिरंगा  | belgaum news | belgavkar बेळगावकर

Republic Day 2022 : Video - कडक सॅल्यूट! मायनस 40 डिग्री तापमान अन् 15000 फूट उंचीवर जवानांनी फडकवला तिरंगा 

belgavkar.com | belgaum | belgavkar

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयटीबीपीच्या जवानांनी लडाखमध्ये 15 हजार फूट उंचीवर उणे 40 डिग्री तापमानात तिरंगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायलं आहे. आज संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जात आहे. याच दरम्यान तब्बल 15000 फूट उंचीवर मायनस 40 डिग्री तापमानात जवानांनी तिरंगा फडकवला आणि भारत माता की जय म्हणत भारतीय जवानांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयटीबीपीच्या (Indo-Tibetan Border Police ) जवानांनी लडाखमध्ये 15 हजार फूट उंचीवर उणे 40 डिग्री तापमानात तिरंगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायलं आहे.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
हिमाचल प्रदेशात 16 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावत इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. प्रसंग कोणताही असो, सीमेवर आपल्या संरक्षणासाठी सतत उभ्या असलेल्या आपल्या जवानांचा सार्थ अभिमान वाटतो. आयटीबीपीने ध्वजारोहणाचे फोटो शेअर केले आहेत. देशात 73 व्या प्रजासत्ताक दिनी उत्साहाचे वातावरण आहे.

bjp-dhananjay-jadhav