आज भारत 26 जानेवारी म्हणजेच 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day of India ) साजरा करत आहे. 1950 मध्ये या दिवशी संविधान लागू करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमिवर संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनी सदरा केला जातो. आज प्रजासत्ताक दिनाच्या ओचित्य साधत संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आकर्षक तिरंगी फुलांनी सजले आहे. गाभाऱ्या सह संपुर्ण देवळाला तिरंग्याच्या रंगात सजवाट करण्यात आली आहे.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
- बेळगाव : तरुणाच्या खूनाचा संशय
- बेळगाव : तिघांना अटक; बेळगाव शहर आणि उपनगरांत घरफोड्या
- बेळगाव : वरातीदरम्यान झालेल्या वादाप्रकरणी 8 जणांना अटक;
- बेळगाव : खंजर गल्लीत दोघांना अटक
संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असतानाच आज राज्यातील मंदिरे तिरंगी रंगाच्या फुलांच्या सजावटीत नाहुन निघाली आहेत. आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रजासत्ताकदिनी आकर्षक फुलांमध्ये सजले आहे. आकर्षक तिरंगी फुलांनी सजलेले समाधी मंदिर आज वेगळ्या रुपात पाहिला मिळाले. झेंडु ,शेवंती,
लव्हेन्डर,गुलाब तसेच कामिनीचि पाने या सर्वांचा यामध्ये समावेश आहे. या सजावटीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची समाधी भाविकांना अगदी मंत्रमुग्ध करुन टाकत आहे. समाधीच्या मागे देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.