belgavkar - बेळगावकर - belgavkar.com - belgaum

बेळगाव महापौर आणि उपमहापौर पद महिलांसाठी राखीव

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. नगरविकास खात्याने आरक्षण जाहीर केले आहे. नगर विकास खात्याच्या अधिकृत माहितीमुळे महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
महापालिका निवडणूक होऊन चार महिने उलटले पण अद्यापही सभागृह अस्तित्वात आलेले नाही. महापौर-उपमहापौर निवड झाली नसल्याने नगरसेवकांना अधिकार प्राप्त कधी होणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळेच महापौर-उपमहापौर निवडणुकीचे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरकारने आता दोन्ही जागांसाठी नवीन आरक्षण जाहीर केले आहे. महापौर पदासाठी सामान्य गट (general) आणि उपमहापौर पदासाठी मागास ब गटातील महिला सदस्याची निवड केली जाणार आहे. लवकरच निवडणूक तारखेची घोषणा होणार आहे.
bjp-dhananjay-jadhav