news.jpg | बेळगाव : महामेळावा प्रकरणी समिती कार्यकर्त्यांना जामीन मंजूर... | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : महामेळावा प्रकरणी समिती कार्यकर्त्यांना जामीन मंजूर...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये 'विधानसौध' इथं घ्यायला सुरूवात केली आहे. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ठ असल्यामुळे कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला इथल्या मराठी भाषिकांचा विरोध आहे. हाच विरोध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सिन डेपो इथं 13 डिसेंबर रोजी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण महापालिका आणि पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी दिली नव्हती. टिळकवाडीतील महामेळाव्यासाठी परवानगी न घेता व्यासपीठ उभारण्याबरोबरच महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास विरोध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून नोटिसा देण्यात आल्या आहेत.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
टिळकवाडी पोलीस स्थानकात 28 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी समिती नेते व कार्यकर्त्यांना नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. आज 26 जानेवारी रोजी नेताजी जाधव, रणजित चव्हाण पाटील, रेणू किल्लेकर, श्रीकांत कदम, सुरज कुडूचकर, सचिन केळवेकर, सुनील बोकडे हे टिळकवाडी पोलीस स्थानकात हजर झाले होते. त्यांना आज पोलीस स्थानकात जामीन देण्यात आला.
bjp-dhananjay-jadhav