news.jpg | बेळगाव : दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात प्रजासत्ताक दिनी विशेष आरास | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात प्रजासत्ताक दिनी विशेष आरास

belgavkar.com | belgaum | belgavkar


बेळगाव : दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विशेष आकर्षक आरास करण्यात आली आहे. कपिलनाथांना तिरंगा फेटा परिधान करण्यात आला. शिवलिंगाजवळ बैलजोडीची मूर्ती ठेवून आजची आरास बळीराजाला अर्पण करण्यात आली.
सचिन आनंदाचे, गणेश देवर, कल्लाप्पा ज्योते यांनी ही आकर्षक आरास केली आहे. आरास केल्यानंतर पूजा-अर्चा झाली. पौरोहित्य नागराज कट्टी यांनी केले. यावेळी अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, सतीश निलजकर, राजू भातकांडे, राहुल कुरणे, विवेक पाटील आदी ट्रस्टी सेवेकरी उपस्थित होते.