news.jpg | बेळगाव : शहीद वीर जवानाच्या सुपुत्राच्या शुभहस्ते ध्वजारोहण | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : शहीद वीर जवानाच्या सुपुत्राच्या शुभहस्ते ध्वजारोहण

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मोदगे (ता. हुक्केरी) येथील शहीद स्मारकाजवळ मोठ्या उत्साहात 73 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मोदगे गावातील भारतमातेच्या रक्षणार्थ असलेल्या वीर जवानांनी आजी-माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून मोदगे गावचे वीर सुपुत्र शहीद वीर जवान श्री महादेव कल्लापा पाटील यांच्या स्मारकाजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर प्रजासत्ताक दिनी शहीद वीर जवान श्री महादेव पाटील यांचे सुपुत्र कु. शुभम महादेव पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण केले.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
belgaum-soldier-son-26th-jan-modage-village-belgaum.jpg | बेळगाव : शहीद वीर जवानाच्या सुपुत्राच्या शुभहस्ते ध्वजारोहण | belgaum news | belgavkar बेळगावकर
तसेच शहीद वीर जवान श्री. महादेव पाटील यांच्या फोटोचे पूजन निवृत्त सैनिक श्री. लक्ष्मण निलवे यांच्या शुभहस्ते व राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन निवृत्त सैनिक श्री दत्ता वडर, श्री अर्जुन गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रजासत्ताकदिनी वीरमाता श्रीमती अनुबाई कल्लापा पाटील व वीरपत्नी वैशाली महादेव पाटील व कुटूंबीय तसेच आजी माजी सैनिक संघटनेचे मारुती गावडे, प्रकाश गुरव, संतोष पाटील, अशोक पाटील, सचिन पाटील, प्रदिप दळवी, संजय पाथरवट, यल्लपा सुतार व आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.
bjp-dhananjay-jadhav