बेळगाव : आगामी अर्थसंकल्पात जांबोटीचा मध, शहापूरच्या साड्या आणि आंब्याचे पापड यासह चार स्थानिक उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासन पावले उचलणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पालक मंत्री गोविंद करजोळ यांनी दिली आहे. जांबोटी मध उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया प्रकल्पाच्या स्थापनेबाबत सविस्तर अहवाल मागितला आहे.
बेळगावच्या शहापूर साडीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असलेला अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना फायदा होईल आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल असे नवीन प्रकल्प तयार करून सादर करण्याचे निर्देश त्यांनी विविध विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.