कर्नाटकातील महिंद्रा शोरुममध्ये शेतकऱ्यासोबत झालेल्या गैरवर्तणुकीवर आनंद महिंद्रांचा संताप, म्हणाले...

कर्नाटकातील महिंद्रा शोरुममध्ये शेतकऱ्यासोबत झालेल्या गैरवर्तणुकीवर आनंद महिंद्रांचा संताप, म्हणाले...

belgavkar.com | belgaum | belgavkar

₹ 10 रुपये तरी खिशात आहेत का?
SUV खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सेल्समनकडून अपमान;
अन् मग...

कर्नाटकातील एका महिंद्राच्या शोरुममध्ये शेतकऱ्यासोबत त्याच्या कपड्यावरुन गैरवर्तन करण्यात आल्याची घटना घडली. यानंतर आनंद महिंद्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आनंद महिंद्रा यांनी यासंदर्भात ट्विट करून त्यांच्या कंपनीच्या मूल्यांबद्दल सांगितले आहे. “महिंद्रा राईजचे मूलभूत उद्दिष्ट आमचे समुदाय आणि सर्व स्टेकहोल्डर्सना उभे राहण्यास सक्षम करणे हे आहे. मुख्य मूल्य म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा राखणे,'' असे आनंद महिंद्रा म्हणाले.
कर्नाटकातील तुमकुरू येथील महिंद्राच्या शोरुममध्ये एका शेतकऱ्याशी त्याच्या ड्रेसच्या आधारे गैरवर्तन झाल्याची घटना घडली. केम्पेगौडा नावाचा शेतकरी आपल्या मित्रांसह महिंद्राच्या शोरुममध्ये कार खरेदी करण्यासाठी आला होता, परंतु तेथे उपस्थित असलेल्या एका सेल्समनने त्याच्या पोशाखावरुन त्याच्याशी गैरवर्तन केले. सेल्समन म्हणाला, '10 लाख रुपये दूर, तुझ्या खिशात 10 रुपयेही नाहीत.' यानंतर 30 मिनिटांत तो शेतकरी 10 लाख रुपये रोख घेऊन आला. शुक्रवारी घडलेल्या या घटनेनंतर त्याच दिवशी गाडीची डिलिव्हरी होऊ शकली नाही. शनिवार आणि रविवार सरकारी सुटी असल्याने कर्मचाऱ्यांनी केम्पेगौडा यांना कार डिलिव्हरीसाठी वेळ मागितला, ज्यामुळे केम्पेगौडा आणि त्यांचे मित्र नाराज झाले. त्यांनी टिळक नगर पोलिस ठाण्यात शोरुमविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी येऊन सर्वांना समजावून सांगितले. शोरुमच्या वतीने कंपागौडा यांना लेखी माफी मागण्यात आली आणि हे प्रकरण मिटले.
महिंद्रा अँड महिंद्राचे सीईओ विजय नाकरा यांच्या ट्विटला रिट्विट करुन आनंद महिंद्रा यांनी ही माहिती दिली. नोकरांनी या घटनेशी संबंधित ट्विटमध्ये लिहिले की, “डीलर्स ग्राहक केंद्रित अनुभव प्रदान करण्याचा अविभाज्य भाग आहेत. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांचा आदर आणि सन्मान करतो. आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत आणि फ्रंटलाइन स्टाफचे समुपदेशन आणि प्रशिक्षण यासह कोणतेही उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई करू.”
एखाद्या व्यक्तीची किंमत त्याच्या कपड्यावरून करू नका असं म्हणतात. कपड्यावरून माणसाची पारख न करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र कर्नाटकमधल्या एका सेल्समननं ही चूक केली. तुमकूरमध्ये वास्तव्यास असलेला शेतकरी त्याच्या मित्रासोबत एका कारच्या शोरुममध्ये गेला होता. कार खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचे कपडे पाहून तिथल्या सेल्समननं त्याला हटकलं. त्याचा अपमान केला आणि त्याला तिथून निघून जाण्यास सांगितलं.
चिक्कासांद्रा होबलीमध्ये राहणारे रामनपाल्या के केम्पेगौडा सुपारीची शेती करतात. केम्पेगौडा एसयूव्ही बुक करण्यासाठी शोरुममध्ये गेले होते. मात्र सेल्समननं त्यांची खिल्ली उडवली. केम्पेगौडा यांनी महिंद्रा बुलेरोची माहिती घेतली. दोन लाख डाऊनपेमेंट आणि त्याच दिवशी डिलेव्हरी देण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. सेल्स टीमनं त्यास नकार दिला. त्यावर 10 लाख रुपये एकरकमी भरतो असं केम्पेगौडा यांनी म्हटलं. यावरून सेल्स टीमनं जाणूनबुजून शेतकऱ्यांची थट्टा केली. 10 लाख दूर राहिले. तुमच्या खिशात 10 रुपयेदेखील नसतील, असं म्हणत सेल्समननं केम्पेगौडा यांची खिल्ली उडवली. अर्ध्या तासात 10 लाख रुपये रोख आणल्यास आजच गाडीची डिलिव्हरी करू, असं सेल्समन म्हणाला.
त्यानंतर केम्पेगौडा यांनी लगेचच त्यांच्या मित्रांना रोख रकमेची व्यवस्था करण्यास सांगितलं. अर्ध्या तासाच्या आत त्यांनी 10 लाख रुपये जमवले. मात्र त्यानंतर सेल्स टीमनं कार डिलिव्हरीसाठी किमान 3 दिवस लागतील असं सांगितलं. शुक्रवारी ही घटना घडली. त्यानंतर शनिवार, रविवारी सुट्टी असल्यानं कर्मचाऱ्यांनी असहायता व्यक्त केली. त्यामुळे केम्पेगौडा आणि त्यांचे मित्र नाराज झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शेतकऱ्यांनी शोरुमला घेराव घातला. पोलिसांनी कशीबशी त्यांची समजूत काढली. सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि शोरुममधल्या अधिकाऱ्यांनी माझा आणि माझ्या मित्रांचा अपमान केला आहे. मला कार नको. लिखित माफी हवी. अन्यथा शोरुमबाहेर आंदोलन करू, असा इशारा केम्पेगौडा यांनी दिला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटकातील महिंद्रा शोरुममध्ये शेतकऱ्यासोबत झालेल्या गैरवर्तणुकीवर आनंद महिंद्रांचा संताप, म्हणाले...
₹ 10 रुपये तरी खिशात आहेत का? SUV खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सेल्समनकडून अपमान; अन् मग...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm