news.jpg | बेळगाव : काँग्रेस रोडवरील हॉटेलला आग; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : काँग्रेस रोडवरील हॉटेलला आग;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काँग्रेस रोडवरील मास्टरशेफ हॉटेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे ब्रॉयलरला आग लागल्याची घटना घडली आहे. आज बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हॉटेलच्या किचनमध्ये धूर बाहेर काढण्यासाठी सज्ज असलेल्या ब्रॉयलरला शॉर्टसर्किटने आग लागली. आग लागल्याने हॉटेलमध्ये धुराचे लोट पसरले होते.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी बी. आर. टक्केकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी दाखल होवून लागलीच ही आग विझवली. या घटनेत दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीतल सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
bjp-dhananjay-jadhav