बेळगाव : बसूर्ते येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेला 7 ग्रीन बोर्ड

बेळगाव : बसूर्ते येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेला 7 ग्रीन बोर्ड

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : 'भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ' च्या वतीने बसूर्ते येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेला 7 ग्रीन बोर्ड वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपा ग्रामीण मंडळाच्या वतीने 60 गावांतील 400 वर्गखोल्यांना ग्रीन बोर्ड देण्याचा संकल्प करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. विधानपरिषद सदस्य साबन्ना तळवार यांच्या अनुदानातून हे बोर्ड वितरण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, भाजपा राजकारणाबरोबरच समाजकारणमध्येसुद्धा अग्रेसर आहे. ग्रामीण मंडळ मधील निष्ठावंत व त्यागमय जीवन जगणाऱ्या कार्यकर्त्यांनमुळेच असे उपक्रम तडीस नेण्यास मदत मिळते. ग्रामीण भागातील शाळांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने कार्यकर्ते कार्यरत आहेत.
कोरोना काळामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी जीवावर उदार होऊन कार्य केले आहे. विद्यार्थी, शिक्षक वर्ग, शाळा सुधारणा समिती आणि विद्यार्थ्यांचे पालक अशा सर्वांनी एकत्र येऊन शाळेचा सर्वांगीण विकास करण्याच्या दिशेने कार्य करूया असे ते म्हणाले.
याप्रसंगी सरकारी मराठी प्राथमिक शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. रविंद्र हुदेंलवाडकर, ग्राम पंचायत सदस्य श्री. नेताजी बेनके, श्री. दत्ता बेनके, ग्राम पंचायत सदस्या श्रीमती. लक्ष्मी कुराडे, शिक्षिका श्रीमती. एस एन पाटील व श्रीमती.अनुराधा तारिहाळकर, शिक्षक श्री. नामदेव पाटील तसेच सुरज सुतार, पवन देसाई, ताळोबा घुमटे, निवृती मोरे, महेंद्र नाईक, शिवाजी घुमटे, विलास हुंदेलवाडकर, गळगु बेनके, मिथिल जाधव, यतेश हेब्बाळकर, लक्ष्मण गोजगेकर व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव पाटील सरांनी तर आभार प्रदर्शन अनुराधा तारिहाळकर यांनी करून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बसूर्ते येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेला 7 ग्रीन बोर्ड

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm