बेळगावची 'प्रभा' ठरणार बेळगावची 'शोभा'

बेळगावची 'प्रभा' ठरणार बेळगावची 'शोभा'

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सावित्रीच्या लेकी आता सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहेत. सावित्रीची लेक असल्याचा सार्थ अभिमान बाळगत प्रभा भालचंद्र बिशीरोट्टी या महिलेने रिक्षाचे स्टेअरिंग आपल्या हाती धरले आहे . बेळगाव शहरामध्ये ‘पिंक ऑटो’ रुजू होत असून प्रभा ही रिक्षा चालविणार आहे. ‘इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव’च्या विशेष प्रयत्नाने आणि पुढाकारातून आज ही रिक्षा सुरू होत आहे.
प्रभा रुक्मिणीनगर येथे राहतात. त्यांचे पती रिक्षाचालक आहेत. दुर्दैवाने त्यांच्या पायाला इजा झाली आणि बराच खर्च आला. या दाम्पत्याला तीन मुले आहेत. औषधोपचारांचा खर्च आणि कुटुंबाचा खर्च याचा ताळमेळ बसणे कठीण झाले. तेव्हा प्रभा यांनी परिसरातील काही घरांमध्ये स्वयंपाकाचे काम घेतले. या परिसरात असणार्‍या विद्यार्थ्यांना स्वयंपाक करून देण्याचे काम त्या करतात. तथापि, वाढत्या महागाईमध्ये आर्थिक ओढाताण तीव्र झाल्याने पर्यायी कामाचा विचार त्या करू लागल्या. दरम्यान, त्यांचे एक परिचित रामकृष्ण यांचा शोभा कुलकर्णी यांच्याशी परिचय होता. त्यांनी शोभा यांना प्रभा यांची परिस्थिती सांगितली.
त्यांनी इनरव्हीलच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. सुषमा शेट्टी यांच्याकडे प्रभाची कहाणी कथन केली. इनरव्हील क्लबने प्रभा यांना ‘आत्मनिर्भर’ करण्याच्या हेतूने विचार केला आणि त्यांना रिक्षा घेऊन देण्याचे ठरविले. कॅनरा बँकेने यासाठी कर्ज देवू केले. या कर्जाचे डाऊनपेमेंट इनरव्हीलने केले. पहिल्या दोन हप्त्याची रक्कमही क्लबतर्फे दिली जाणार आहे. प्रभा यांना त्यांच्या पतीने रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. आपण कष्ट करू. इनरव्हीलने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करू, अशी ग्वाही प्रभा यांनी दिली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावची 'प्रभा' ठरणार बेळगावची 'शोभा'

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm