Cyber Fraud Alert : बाकी काही करा, पण 'ही' अ‍ॅप्स स्मार्टफोनमधून लगेच डिलीट करा, नाहीतर...

belgavkar.com | belgaum | belgavkar

पाहा कोणती आहेत ही अँड्रॉईड अ‍ॅप्स

डेली फिटनेस ओएल, पॅनोरमा कॅमेरा, बिझनेस मेटा मॅनेजर, स्विम फोटो, एन्जॉय फोटो एडिटर, क्रिप्टोमायनिंग फार्म युवर ओन कॉईन आणि फोटो गेमिंग पझल

आपण बरेचदा कुठेतरी पाहून किंवा काही ऐकून Google Play Store वरुन अ‍ॅप्स डाऊनलोड करत असतो. परंतु काही वेळा ही अ‍ॅप्स आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात याची मात्र आपल्याला कल्पना नसते. दरम्यान, सायबर सुरक्षा कंपनी ट्रेंड मायक्रोच्या नव्या रिपोर्टनुसार प्ले स्टोअरवरील 200 पेक्षा अधिक अ‍ॅप्स धोकादायक असून यात फेसस्टिलर नावाचा एक स्पायवेअर आल्याचं म्हटलं आहे. हा केवळ तुमचा पर्सनल डेटाच चोरत नाही, तर फेसबुक पासवर्ड आणि अन्य माहितीही चोरू शकतो, असं सांगण्यात आलंय. facestealer स्पायवेअरसह 200 पेक्षा जास्त अ‍ॅप्स व्यतिरिक्त, Trend Micro ला 40 हून अधिक बनावट क्रिप्टोकरन्सी मायनर अ‍ॅप्स सापडले आहेत.
हे क्रिप्टो पैसे चोरण्याचा आणि युझर्सच्या परवानगीशिवाय संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत होते. तब्बल 1 लाखांहून अधिक युझर्सकडे हे अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्यात आल्याचंही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. युझर्सची माहिती गोळा करणाऱ्या काही अ‍ॅप्समध्ये डेली फिटनेस ओएल, पॅनोरमा कॅमेरा, बिझनेस मेटा मॅनेजर, स्विम फोटो, एन्जॉय फोटो एडिटर, क्रिप्टोमायनिंग फार्म युवर ओन कॉईन आणि फोटो गेमिंग पझल यांचा समावेश आहे. हे सर्व अ‍ॅप्स शेकडो युझर्सनं डाऊनलोड केले होते. तुमच्या फोनमध्ये हे अ‍ॅप्स असतील तर ते लगेच अनइन्स्टॉल करा. अहवालानुसार, Google ने स्पायवेअरची दखल घेतली असून ही अ‍ॅप्स त्वरित काढून टाकली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Cyber Fraud Alert : बाकी काही करा, पण 'ही' अ‍ॅप्स स्मार्टफोनमधून लगेच डिलीट करा, नाहीतर...
पाहा कोणती आहेत ही अँड्रॉईड अ‍ॅप्स

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm