बेळगाव : प्रखर हिंदू विचारवंत विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यसेनानी सोबतच लेखक, तत्त्वज्ञ, भाषाकार होते. मातृभूमीच्या प्रेमापोटी त्यांनी आपले जीवन अर्पण केले. तसेच कठोर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. पाकिस्तान चे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव 4 एप्रिल 1950 साली सावरकर यांना अटक करण्यात आले होते. 4 एप्रिल 1950 ते 13 जुलै 1950 म्हणजेच 100 दिवस त्यांचे बेळगावच्या हिंडलगा कारागृहात वास्तव्य होते.
देशभक्त सावरकरांचं संपूर्ण आयुष्य तरूण पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्या ज्वलंत आणि दुरगामी विचारांमधून त्याचा प्रत्यय येतो. म्हणूनच आज त्यांच्या जयंती निमित्त पुढच्या पिढीसाठी आदर्श असणार्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त बेळगावच्या हिंडलगा कारागृहात श्रीराम सेना आणि हिंदूराष्र्ट सेनेचे रवीकुमार कोकीतकर यांच्या नेतृत्वाखाली सावरकरांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती : मा. श्री. रवीकुमार कोकीतकर, नागेश सरफ, नविल मत्तक, विनायक जाधव, संजय गुंगरी, स्वप्निल यळगुडकर, विनोद हंगिरगेकर, संतोष जाधव, सचिन भादवनकर, विनय अंगरोळी, मंथन कुडचिकर, बंटी सरफ
- कोलंबियाच्या कारागृहात दंगल घडवण्याच्या प्रयत्नात भीषण आग, चेंगराचेंगरीत 49 कैद्यांचा मृत्यू
- Indian Rupee : रुपयाची ऐतिहासिक घसरण, इतके रुपये होण्याची शक्यता
- आता 'या' 2 गंभीर आजारांविरोधात लसीकरण सुरू होणार, NTAGI कडून शिफारस
- ‘मी स्त्री आहे, पार्सल नाही...’, गुड न्यूज शेअर केल्यानंतर इतकी का भडकली आलिया भट?