आढळले BA व्हेरियंटचे रुग्ण;
BA.4 च्या 4, तर BA.5 च्या 3 रुग्णांची नोंद

belgavkar.com | belgaum | belgavkar

महाराष्ट्रातील कोरोनाचे जवळपास सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाचे जवळपास सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. पण कोरोना रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे. त्यात आज राज्यात प्रथम कोरोनाच्या BA.4 आणि BA.5 व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याचं आरोग्य विभाग सतर्क झालं आहे. पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू असलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार पुणे शहरात BA.4 व्हेरियंटचे चार तर BA.5 व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. 
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे व्हेरियंट आढळून आले आहेत. इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटरनंही याची पुष्टी केली आहे.  राज्यात आज आढळलेले बी ए. व्हेरियंटचे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहे. यामध्ये चार पुरूषांचा आणि तीन महिलांचा समावेश आहे. सर्व रुग्णांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असून यातील 9 वर्षाच्या लहान मुलाने लस घेतलेली नाही. सर्व रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून सर्व रुग्णांना घरगुती विलिगीकरणात आहे. 
राज्यात 2772 सक्रिय रुग्णांची नोंद : राज्यात आज एकूण 2772 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1929 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये 318 इतके सक्रिय रुग्ण आहेत. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

आढळले BA व्हेरियंटचे रुग्ण; BA.4 च्या 4, तर BA.5 च्या 3 रुग्णांची नोंद
महाराष्ट्रातील कोरोनाचे जवळपास सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत.

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm