news.jpg | IPL 2022 Prize Money : पुढच्या वर्षी संघांना बम्पर 'वाढ' मिळणार, पण यंदा विजेता संघ किती रुपये कमावणार?; | belgaum news | belgavkar बेळगावकर

IPL 2022 Prize Money : पुढच्या वर्षी संघांना बम्पर 'वाढ' मिळणार, पण यंदा विजेता संघ किती रुपये कमावणार?
;

belgavkar.com | belgaum | belgavkar

इंडियन प्रीमिअर लीग 2022 चा अंतिम सामना रविवार 29 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार


इंडियन प्रीमिअर लीग 2022 चा अंतिम सामना रविवार 29 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएल 2022 मध्ये प्रथमच खेळणाऱ्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) घरच्या मैदानाचा फायदा उचलण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, त्यांच्यासमोर 2008 च्या विजेत्या राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) आव्हान आहे. गुजरात व लखनौ सुपर जायंट्स हे दोन नवे संघ दाखल झाल्याने बीसीसीआयच्या महसुलातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळेच आयपीएल 2023 मध्ये बक्षीस रक्कमेत 20-25 टक्के वाढ करणार असल्याचा विचार BCCI करत आहे. मात्र, यावेळच्या विजयी संघाला किती रक्कम मिळणार हे माहित्येय का?
InsideSport ला बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बक्षीस रक्कमेत वाढ, हा विषय चर्चेत आहे. पुढील आयपीएलमध्ये 20 ते 25 टक्के वाढ करण्याचा विचार सुरू आहे, परंतु अद्याप नेमकी किती रक्कम हे ठरलेले नाही. आयपीएल 2023 ला सुरूवात होण्यापूर्वी त्याची घोषणा केली जाईल.'' 2016 मध्ये आयपीएलच्या बक्षीस रक्कमेत वाढ करण्यात आली होती.
आयपीएल 2022 ची बक्षीस रक्कम (IPL 2022 Prize Money)
विजेता संघ - 20 कोटी
उपविजेता - 13 कोटी
तिसरा क्रमांक - 7 कोटी
चौथा क्रमांक - 6.5 कोटी
2016 नंतर 2017 मध्ये बक्षीस रक्कम कमी करून 15 कोटी करण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये ती पुन्हा 20 कोटी करण्यात आली. 2020 मध्ये कोरोनामुळे ही रक्कम 10 कोटी करण्यात आली होती. पण, यावेळेस बीसीसीआयने स्पॉन्सरशीपमधून विक्रमी 1000 कोटी कमावले.