बापरे...! आईच्या मृत्यूमुळे 'तो' दु:खी झाला; तब्बल 1.3 कोटींची BMW कार नदीत फेकून आला अन्... कर्नाटक

बापरे...!
आईच्या मृत्यूमुळे 'तो' दु:खी झाला;
तब्बल 1.3 कोटींची BMW कार नदीत फेकून आला अन्... कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

एका तरुणाने स्वत: आपली कार नदीत फेकली आहे.

कर्नाटक : देशात अनेक अजब-गजब घटना समोर येत आहेत. अशीच एक अजब घटना आता घडली आहे. एका तरुणाने आपली बीएमडब्ल्यू कार चक्क नदी फेकल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पोलिसांसह स्थानिकही हैराण झाले आहे. सुरुवातीला सर्वांना चुकून गाडी नदीत पडली की काय असं वाटलं. पण तपासात वेगळंच सत्य समोर आलं आहे. कर्नाटकातील बंगळुरूत राहणाऱ्या एका तरुणाने स्वत: आपली कार नदीत फेकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आईच्या अचानक झालेल्या निधनामुळे तरुण खूप उदास झाला होता. यानंतर त्याने आपली बीएमडब्ल्यू कार कावेरी नदीत फेकून दिली.
स्थानिकांना नदीत अर्धवट अडकलेली बीएमडब्ल्यू एक्स6 कार दिसली. याची किंमत तब्बल 1.3 कोटी रुपये आहे. याबाबत त्यांनी पोलिसांना सांगितलं. सुरुवातील पोलिसांना वाटलं की, गाडीत कोणीतरी असावं, मात्र काही वेळानंतर गाडीत कोणीच चालक नसल्याचं कळालं आणि पोलिसांनी कार बाहेर काढली. परिवहन अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी कारबाबत अधिक माहिती मिळवली. यात कळालं की, कारचा मालक बंगळुरूतील महालक्ष्मी लेआउटचा निवासी आहे. यानंतर पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांना याबाबत सांगितलं. आईच्या निधनानंतर तो डिप्रेशनमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितलं.  दुःखातून बाहेर पडू न शकल्याने तो आपल्या कारने श्रीरंगपटना येथे आला आणि बंगळुरूला परत येण्यापूर्वी निराशेत त्याने कार नदीत फेकली.
श्रीरंगपट्टणाचे उपनिरीक्षक पुनीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईकांच्या साक्षीनंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबाने कार परत बंगळुरूला नेली. या घटनेसंदर्भात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बापरे...! आईच्या मृत्यूमुळे 'तो' दु:खी झाला; तब्बल 1.3 कोटींची BMW कार नदीत फेकून आला अन्... कर्नाटक
एका तरुणाने स्वत: आपली कार नदीत फेकली आहे.

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm