बेळगाव : तुरमुरी गावात झालेल्या चोरी प्रकरणी वडगाव ग्रामीण पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे. महेश भक्तीकर (वय 28, रा.तुरमुरी) व आकाश डोंगरे (वय 22, रा.मन्नुर) अशी आरोपींची नावे आहेत. 8 एप्रिल रोजी तुरमुरी गावातील परशुराम केदारी भक्तीपर यांच्या घरात चोरी झाली होती. वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे मंडल पोलीस निरीक्षक श्रीनिवास हांडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 26 मे रोजी सकाळी हिंडलगा चेकपोस्टजवळ दोन दुचाकीसह दोघा संशयितांना ताब्यात घेतले.
त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी तुरमुरी येथे झालेल्या चोरी प्रकरणाची कबुली दिली. त्यांच्याकडून 38 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी व अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
- कोलंबियाच्या कारागृहात दंगल घडवण्याच्या प्रयत्नात भीषण आग, चेंगराचेंगरीत 49 कैद्यांचा मृत्यू
- Indian Rupee : रुपयाची ऐतिहासिक घसरण, इतके रुपये होण्याची शक्यता
- आता 'या' 2 गंभीर आजारांविरोधात लसीकरण सुरू होणार, NTAGI कडून शिफारस
- ‘मी स्त्री आहे, पार्सल नाही...’, गुड न्यूज शेअर केल्यानंतर इतकी का भडकली आलिया भट?