belgaum-body-of-a-youth-was-found-near-the-government-hospital-at-Bahadurwadi-Kinaye-murder-202205.jpg | बेळगाव : तरुणाच्या खूनाचा संशय | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : तरुणाच्या खूनाचा संशय

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बहाद्दरवाडी-किणये येथील सरकारी रुग्णालयाशेजारी शनिवारी तरुणाचा मृतदेह आढळला असून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. देवाप्पा सुरेश सुतार (वय 18, शिवमनगर, बहाद्दरवाडी) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात झाली आहे. हा तरुण गेल्या आठ दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. शनिवारी सकाळी किणये सरकारी हॉस्पिटलच्या बाजूला एका शेतकऱ्याने बोरवेल खोदाई करण्यासाठी जागा पाहणी करत असताना बाजूला असलेल्या खड्यांमध्ये शिर धडावेगळे झालेला मृतदेह पाहिला.
त्वरित याबाबत बेळगाव ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक श्रीनिवास हंडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता तो मृतदेह देवाप्पा सुतार याचा असल्याचे निष्पन्न झाले.