belgaum-dhamane-mes-workers-kirik-for-playing-kannada-song-at-the-wedding-function-in-belgaum.jpg | बेळगाव : वरातीदरम्यान झालेल्या वादाप्रकरणी 8 जणांना अटक; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : वरातीदरम्यान झालेल्या वादाप्रकरणी 8 जणांना अटक;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : वरातीदरम्यान कुरबरट्टी (धामणे) येथे गुरुवारी रात्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीजवळ फटाके फोडण्यावरून दोन गटांतील धक्काबुक्कीप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. सिद्दण्णा सायबण्णावर (रा. कुरबरट्टी धामणे) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करून घेऊन अटकेची कारवाई केली. आनंद मारुती रेमाण्णाचे (रा. कुरबरट्टी धामणे) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 12 संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, यापैकी कोणालाही अटक झाली नाही.
सिद्दण्णा सायबण्णावर यांच्या फिर्यादीवरून आकाश सिद्राय यळ्ळूरकर, यल्लाप्पा परशराम रेमाण्णाचे, अजय शिवाजी यळ्ळूरकर, संतोष परशराम रेमाण्णाचे, प्रसाद रेमाण्णाचे, मारुती यालाप्पा रेमाण्णाचे, महेश परशराम मारगाण्णाचे, जगन्नाथ विठ्ठल रेमाण्णाचे (सर्व रा. कुरबरट्टी धामणे) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आनंद रेमाण्णाचे यांच्या फिर्यादीवरून रामा नागाप्पा सायबण्णावर, भरमा हालाप्पा सायबण्णावर, किरण बाळू रामा कल्लाप्पा सायबण्णावर, राजू बाळू सायबण्णावर, राजू रामा सायबण्णावर, बळराज विठ्ठल अलगुंडी, शंकर विठ्ठल सायबण्णावर, गंगाराम नागप्पा सायबण्णावर, पवन विठ्ठल अलगुंडी, शिवम कल्लाप्पा सायबण्णावर, सायबण्णावर (सर्व रा. कुरबरट्टी धामणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सायंकाळी एका गटाचीच फिर्याद घेतली. रात्री उशिरा दुसऱ्या गटाची फिर्याद दाखल केली. यात मराठी भाषिक तरुणांनाच अटक केली असून दुसऱ्या गटातील संशयितांना अटक झाली नाही. पोलिस निरीक्षक श्रीनिवास हंडा तपास करीत आहेत.