बेळगाव : भेंडिगेरी येथे संगोळ्ळी रायण्णा पुतळ्यावर दगडफेक करण्याबरोबर दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांचे छायाचित्र फाडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक करण्यात हिरेबागेवाडी पोलिसांना यश आले आहे. मराठा समाजाला लक्ष्य करून दाखल करण्यात आलेल्या खोट्या तक्रारीचा पोलखोल झाला आहे. चंद्राप्पा लक्ष्मण कणबर्गी (रा. भेंडिगेरी), महांतेश करिगार (रा. शिंदोळी), बसवराज उर्फ देवाप्पा हुलमनी, अर्जुन बोजप्पा शिनायकर (दोघेही रा. नेगीनहाळ, ता. बैलहोंगल) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
भेंडिगेरी येथे 21 मे रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी संशयित चंद्राप्पा कणबर्गी (रा. भेंडिगेरी) याने मराठा समाजातील नागरिकांविरूद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर मराठा समाजाला लक्ष्य करून खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. माहितीनुसार तक्रारदार चंद्रप्पा याच्या भावाच्या मुलीचा विवाह होनीहाळ येथील मारुती याच्याबरोबर निश्चित करण्यात आला होता. मात्र, वधू अल्पवयीन असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून सदर विवाह रोखण्यात आला होता. या विवाहाची माहिती मराठा समाजातील नागरिकांनी दिली असल्याच्या संशयाने मराठा समाजाला लक्ष्य करण्यात आले होते. संशयितांनी संगोळ्ळी रायण्णा पुतळ्यावर दगडफेक करून दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या छायाचित्र फाडले होते.
मात्र, चंद्रप्पा कणबर्गी याने द्वेषातून मराठा समाजातील नागरिकांनी दगडफेक केल्याची तक्रार जाणीवपूर्वक दाखल केली होती. या घटनेचा तपास घेतल्यानंतर मराठा समाजाला जाणीवपूर्व लक्ष्य करण्यात आल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
- कोलंबियाच्या कारागृहात दंगल घडवण्याच्या प्रयत्नात भीषण आग, चेंगराचेंगरीत 49 कैद्यांचा मृत्यू
- Indian Rupee : रुपयाची ऐतिहासिक घसरण, इतके रुपये होण्याची शक्यता
- आता 'या' 2 गंभीर आजारांविरोधात लसीकरण सुरू होणार, NTAGI कडून शिफारस
- ‘मी स्त्री आहे, पार्सल नाही...’, गुड न्यूज शेअर केल्यानंतर इतकी का भडकली आलिया भट?