belgaum-Appointment-of-Vaibhav-Kadam-as-Belgaum-District-President-of-Karnataka-Kshatriya-Maratha-Federation-202205.jpg | बेळगाव : कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या बेळगाव जिल्हाध्यक्षपदी वैभव कदम यांची नियुक्ती | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या बेळगाव जिल्हाध्यक्षपदी वैभव कदम यांची नियुक्ती

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या बेळगाव जिल्हाध्यक्षपदी वैभव कदम यांची नियुक्ती करण्यात आली. हॉटेल सन्मान येथे झालेल्या फेडरेशनच्या बैठकीत संघटनेचे राज्य शाखाध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन श्री. कदम यांचा सत्कार करण्यात आला.
संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, उपाध्यक्ष माजी आमदार मनोहर कडोलकर, राज्यमहिला उपाध्यक्षा मंगला कशिलकर, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष विनायक देसाई, राज्य सचिव विठ्ठल वाघमोडे व अनिल माने आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी, वैभव कदम हे संघटनेचे काम बेळगाव जिल्ह्यात जोमाने पुढे नेतील मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील, अशी आशा व्यक्त केली. या वेळी फेडरेशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.