belgaum-3-lakh-worth-of-goods-were-stolen-from-the-shop-belgaum-nipani-202205.jpg | बेळगाव : दुकान फोडून 3.7 लाखांचा माल लंपास | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : दुकान फोडून 3.7 लाखांचा माल लंपास

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : निपाणी येथील मुरगूड रोड उड्डाणपुलाजवळील के. टी. बाईक अँक्सेसरीज दुकान फोडून चोरट्यांनी 3 लाख 70 हजारांचा माल लंपास केला. शनिवारी सकाळी ही उघडकीस आली. याबाबत माहिती अशी, हुजैफ बागवान यांचे मुरगूड रोड उड्डाणपुलाजवळ दुकान आहे. शनिवारी सकाळी मागविलेला माल ठेवण्यासाठी मालकाने दुकान उघडताना कुलूप उचकटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आत जाऊन पाहणी केली असता दुकानातील बऱ्याच मोटारसायकली व बुलेटचे स्पेअर पार्टस् साहित्याची चोरी झाल्याचे आढळले.
चोरीची घटना लक्षात येताच दुकान मालकाने पोलिसांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दुकान मालकाने 3 लाख 70 हजारांचा माल चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास निपाणी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसुर करत आहेत.