बेळगाव : धामणेतील गुंडगिरी खपवून घेणार नाही

बेळगाव : धामणेतील गुंडगिरी खपवून घेणार नाही

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : वरातीदरम्यान कुरबरट्टी (धामणे) येथे गुरुवारी रात्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीजवळ फटाके फोडण्यावरून दोन गटांतील धक्काबुक्कीप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. धामणे येथे लग्नाच्या वरातीत झालेल्या किरकोळ वादाला महाराष्ट्र एकीकरण समितीला जबाबदार धरण्यात आले आहे. ही गुंडगिरी खपवून घेणार नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. धामणे येथील घटनेच्या वस्तुस्थितीचा अभ्यास न करता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो. यावरून ऊठसूट समितीविरुद्ध गरळ ओकण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
धामणे येथील लग्नाच्या मिरवणुकीतील क्षुल्लक वादाला भाषिक रंग देण्याचा काहींनी प्रयत्न केला आहे. धामणेत मराठी व कन्नड भाषिक गुण्यागोविंदाने वावरत असताना काही मराठीद्वेष्ट्यांनी मराठी तरुणांवर आरोप करून बसवराज बोम्मई त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. मुख्यमंत्री या नात्याने बोम्मई यांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करून गावात शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश द्यायला हवे होते. परंतु, तसे काहीही न करता त्यांनी समितीची गुंडगिरी खपून घेणार नसल्याचे वक्तव्य केले आणि पुन्हा एकदा समिती व मराठी भाषिकांविरुद्धचा आपला द्वेष उघड केला.
सिद्दण्णा सायबण्णावर (रा. कुरबरट्टी धामणे) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करून घेऊन अटकेची कारवाई केली. आनंद मारुती रेमाण्णाचे (रा. कुरबरट्टी धामणे) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 12 संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, यापैकी कोणालाही अटक झाली नाही. सिद्दण्णा सायबण्णावर यांच्या फिर्यादीवरून आकाश सिद्राय यळ्ळूरकर, यल्लाप्पा परशराम रेमाण्णाचे, अजय शिवाजी यळ्ळूरकर, संतोष परशराम रेमाण्णाचे, प्रसाद रेमाण्णाचे, मारुती यालाप्पा रेमाण्णाचे, महेश परशराम मारगाण्णाचे, जगन्नाथ विठ्ठल रेमाण्णाचे (सर्व रा. कुरबरट्टी धामणे) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आनंद रेमाण्णाचे यांच्या फिर्यादीवरून रामा नागाप्पा सायबण्णावर, भरमा हालाप्पा सायबण्णावर, किरण बाळू रामा कल्लाप्पा सायबण्णावर, राजू बाळू सायबण्णावर, राजू रामा सायबण्णावर, बळराज विठ्ठल अलगुंडी, शंकर विठ्ठल सायबण्णावर, गंगाराम नागप्पा सायबण्णावर, पवन विठ्ठल अलगुंडी, शिवम कल्लाप्पा सायबण्णावर, सायबण्णावर (सर्व रा. कुरबरट्टी धामणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सायंकाळी एका गटाचीच फिर्याद घेतली. रात्री उशिरा दुसऱ्या गटाची फिर्याद दाखल केली. यात मराठी भाषिक तरुणांनाच अटक केली असून दुसऱ्या गटातील संशयितांना अटक झाली नाही. पोलिस निरीक्षक श्रीनिवास हंडा तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : धामणेतील गुंडगिरी खपवून घेणार नाही

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm