बेळगाव : 14 किलो चंदन जप्त; तिघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. रायबाग : तालुक्यातील नंदीकुरळीत चंदन झाडाची चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीला ताब्यात घेतले. वन खात्याच्या पथकाने कारवाई केली. भीमाप्पा राजाराम वड्डर, तिमन्ना भीमाप्पा वड्डर, आनंद नागप्पा वड्डर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून 14 किलो चंदन जप्त केले आहे.
नंदीकुरळीतील पंचलिंगेश्वर मठाजवळ ओढ्यात असलेले चंदनाचे झाड तोडून ते विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपवनाधिकारी आंतोनी एस. मारीयप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सहाय्यक वनाधिकारी सुनीता निंबरगी यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकून तिघांना ताब्यात घेत 14 किलो चंदन जप्त केले. प्रकरण दाखल करून घेऊन संशयितांना न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयीन कोठडी घेतली आहे. चंदनचोरीमागे रॅकेट असण्याचा संशय असून त्याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाईत वनाधिकारी सुनील सुंबळी यांच्यासह अधिकरी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.