news.jpg | हृदयदावक.! एकाच कुटुंबात 5 जणांचा संशयास्पद मृत्यू, 3 बहिणींपैकी 2 गर्भवती | belgaum news | belgavkar बेळगावकर

हृदयदावक.! एकाच कुटुंबात 5 जणांचा संशयास्पद मृत्यू, 3 बहिणींपैकी 2 गर्भवती

belgavkar.com | belgaum | belgavkar


राजस्थानात एक ह्द्रयद्रावक घटना समोर आली आहे. जयपूरच्या दूदू परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह विहिरात आढळला आहे. या खळबळजनक घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. प्रथमदर्शनी पोलिसांनी या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं वर्तवलं आहे. मृतकांमध्ये 3 बहिणींचा समावेश आहे. ज्यांचे लग्न एकाच कुटुंबात कमी वयात झाले होते आणि त्यांना 2 मुले होती. यातील 2 महिला गर्भवती होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार, 25 मे रोजी तिन्ही बहिणी बाजाराच्या निमित्ताने घरातून बाहेर पडल्या होत्या. परंतु जेव्हा त्या घरी परतल्या नाहीत तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी विविध ठिकाणी शोध घेतला आणि पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
तर दुसरीकडे या तीन बहिणींचा चुलत भाऊ हेमराज मीणा याने आरोप लावलाय की, माझ्या एका बहिणीला तिच्या सासरच्या माणसांनी बेदम मारहाण केली होती. आमच्या बहिणींची हत्या झाली आहे असं त्याने म्हटलं. पोलिसांना मृतदेह शोधण्यास खूप उशीर झाला. या प्रकरणी पोलिसांनी सासरकडील काही लोकांना ताब्यात घेतले आहे. मृतांमध्ये काली देवी (27), ममता मीणा (23) आणि कमलेश मीणा (20) तर हर्षित (4) आणि 20 महिन्याचा एका चिमुकलाही होता. ममता आणि कमलेश दोघीही गर्भवती होत्या. जयपूर ग्रामीण एसपी मनीष अग्रवाल म्हणाले की, या मृत 3 महिलांपैकी एकीने तिच्या व्हॉट्सअपवर एक स्टेटस पोस्ट केले होते. ती सासरच्या छळाला कंटाळली होती. त्यामुळे मरणं चांगले आहे असं तिने म्हटलं होते. मृत महिलांच्या वडिलांनी सासरच्या लोकांविरोधात हुंड्यासाठी सातत्याने छळ करत असल्याचा गुन्हा नोंदवला. 
या तिन्ही बहिणींनी जीवापाड मेहनत घेत शिक्षण पूर्ण करून आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु तिन्हीचे पती अशिक्षित असल्याने दारू पिऊन मारहाण करत असे. ते व्यसनाधीन होते. वडिलोपार्जित संपत्ती विकून आयुष्य जगत होते. कुठलेही काम करत नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या महरानी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या कमलेशनं सेंट्रल यूनिवर्सिटीत प्रवेश घेतला होता. तर तिचा पती सहावीपर्यंत शिकला होता. ममताचं पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेत निवड झाली होती. तर मोठी बहीण काली बीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. मात्र या तिघी बहिणींच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.