belgaum-sadalaga-girl-missing-belgaum-chikodi-202205.jpg | बेळगाव : युवती बेपत्ता | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : युवती बेपत्ता

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. चिकोडी - सदलगा : किराणा दुकानास जाऊन येते, असे घरी सांगून गेलेली युवती मांगूरमधून बेपत्ता झाली. स्वप्नाली सुनील सुतार (वय 19, रा. रामनगर, रेंदाळ, ता. हातकणंगले, कोल्हापूर) असे युवतीचे नाव आहे. याबाबत तिचे वडील सुनील रघुनाथ सुतार यांनी सदलगा पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. बेपत्ता स्वप्नाली आजोळी मांगूरमधून 16 मे रोजी दुपारी किराणा दुकानास जाऊन येते, असे सांगून गेली आहे.
स्वप्नालीची उंची 5 फूट 3 इंच, गौरवर्ण, गोल चेहरा, काळे केस, जाड नाक, अंगाने साधारण बांधा आहे. तिने काळ्या रंगाचा टॉप, लाल रंगाची पॅन्ट, पिवळ्या रंगाची ओढणी असलेला चुडीदार परिधान केला आहे. तिला मराठी भाषा अवगत आहे. या वर्णनाची युवती आढळल्यास संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक रवींद्र आज्जन्नवर यांनी केले आहे.