seven-sticky-bombs-recovered-from-drone-terrorist-target-the-amarnath-yatra-bomb-202205.jpeg | जम्मू काश्मीर : पाकिस्तानमधून बॉम्ब घेऊन येणारं ड्रोन सुरक्षा दलानं पाडलं, 7 मॅग्नेटीक बॉम्ब जप्त | belgaum news | belgavkar बेळगावकर

जम्मू काश्मीर : पाकिस्तानमधून बॉम्ब घेऊन येणारं ड्रोन सुरक्षा दलानं पाडलं, 7 मॅग्नेटीक बॉम्ब जप्त

belgavkar.com | belgaum | belgavkar

ड्रोनमध्ये सापडले 7 स्टिकी बॉम्ब

कठुआ जिल्ह्यातील राजबाग परिसरात आज पहाटे पोलिसांनी पाडलेल्या ड्रोनमध्ये 7 स्टिकी बॉम्ब सापडले आहेत. दहशतवाद्यांकडून अमरनाथ यात्रेला लक्ष्य केलं जात आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की दहशतवादी यात्रेच्या बसेसवर हल्ला करण्यासाठी या बॉम्बचा वापर करण्याच्या प्रयत्नात आहेत. याशिवाय दुसऱ्या एका पॅकेटमध्ये सात UBGL(अंडर बॅरल ग्रेनेड) देखील आढळून आले आहेत.
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये संकरित दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्था मजबूत करून दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात आली आहे. या वर्षी सुमारे 87 दहशतवादी सुरक्षा दलांनी मारले आहेत.
13 मे रोजी काश्मिरी पंडित आणि सरकारी कर्मचारी राहुल भट्ट यांची हत्या आणि त्यानंतर काश्मिरी अभिनेत्री अमरीन भट्टची हत्या यावरून जम्मू-काश्मीरमध्ये वातावरण आधीच तणावाचं आहे. ते अधिक बिघडवण्यासाठी दहशतवादी टार्गेट किलिंगचा अवलंब करत असल्याचं स्पष्ट होत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. स्थानिक लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.