हैदराबादमध्ये 15 वर्षीय तरुणाला रॉकी भाई बनणे महागात पडले; हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल

हैदराबादमध्ये 15 वर्षीय तरुणाला रॉकी भाई बनणे महागात पडले;
हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल

belgavkar.com | belgaum | belgavkar

तुम्ही पण 'रॉकी भाई'ची ही स्टाईल मारताय तर सावधान... 15 वर्षीय मुलगा रुग्णालयात दाखल

'रॉकी भाई' यशची केजीएफ चॅप्टर 2 सुपर डूपर हिट ठरली.

'रॉकी भाई' यशची केजीएफ चॅप्टर 2 सुपर डूपर हिट ठरली. या सिनेमाची क्रेझ इतकी वाढलीय की सहाव्या आठवड्यातही हा सिनेमा बक्कळ कमाई करतोय. मात्र यशाच्या उत्तूंग शिखरावर असणाऱ्या 'रॉकी भाई'साठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'रॉकी भाई'ची स्टाईल करने एका 15 वर्षाच्या  मुलाला चांगलच महागात पडलंय. या स्टाईलने त्याला हाॅस्पिटमध्ये पोहोचवलेय. 'KGF Chapter 2' या सुपरहिट चित्रपटातील रॉकी भाईच्या व्यक्तिरेखेने अनेक जण प्रेरीत झाले. काहींनी त्याची ड्रेसिंग स्टाईल, हेअर स्टाईल, दाढीची स्टाईल कॉपी करत मारायला सुरुवात केल्याची घटना आपण ऐकली असेलंच. मात्र ही घटना त्याला अपवाद ठरली. या घटनेत रॉकीच्या सिगारेट पिण्याची स्टाईलशी प्रेरीत होत हैदराबादच्या बंजाराहिल्समध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने सिगारेट पिण्यास सुरुवात केली. सिनेमा संपेपर्यत तो सिगारेट पितच राहीला. अखेर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.   
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने पहिल्यांदाच सिगारेट ओढले होते. तेही खुप मोठ्या प्रमाणात. सिगारेट ओढल्यानंतर कफ झाल्याची तक्रार केली, त्यानंतर त्याचा घसा दुखू लागला. मुलाची तबियत बिघडताना पाहून कुटुंबीयांनी त्याला हैदराबाद येथील सेंचुरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या मुलाची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनूसार,मुलाने 'केजीएफ चॅप्टर 2' रिलीज झाल्यानंतर एका आठवड्यानंतर हा चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट त्याने दोन दिवसांत तीनदा पाहिला. या दरम्यान तो सिनेमा पाहताना सतत धूम्रपान करत होता. ज्यामुळे त्याची तंबियत खराब झाली. 
डॉक्टर पुढे म्हणतात की, प्रेक्षक अनेकदा चित्रपटांमध्ये अभिनेत्यांनी साकारलेल्या पात्रांनी प्रभावित होतात. आणि चित्रपटांतील अभिनेत्यांची कॉपी करू लागतात. ही कॉपी करण त्यांना जीवावरही बेतत. त्यामुळे चित्रपट दिग्दर्शकांनीही लोकांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी चित्रपटात दाखवू नयेत. दरम्यान चित्रपटात दाखवणाऱ्या सर्वंच गोष्टी काही खऱ्या नसतात. तसेच चित्रपटातील भूमिका शुटींग पूरत्याच असतात. त्यामुळे नागरीकांनी जीवावर बेतले अशा अभिनेत्यांच्या स्टाईल कॉपी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

हैदराबादमध्ये 15 वर्षीय तरुणाला रॉकी भाई बनणे महागात पडले; हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल
तुम्ही पण 'रॉकी भाई'ची ही स्टाईल मारताय तर सावधान... 15 वर्षीय मुलगा रुग्णालयात दाखल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm