बेळगावात उद्या समितीचा मोर्चा

belgavkar.com | belgaum | belgavkar

उद्या सकाळी 11 वाजता सरदार मैदानातून मोर्चाला सुरुवात मराठीतून परिपत्रकांसाठी सोमवारी भव्य मोर्चा

बेळगाव : मराठीतून परिपत्रकांसाठी सोमवारी (27 जून) भव्य मोर्चा निघणार असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिली. तसेच प्रशासनाने मोर्चाबाबत आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला, तरी मोर्चा निघणारच, असा निर्धारदेखील व्यक्त करण्यात आली आहे. मध्यवर्ती समितीतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे मोर्चाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी शुक्रवारी मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांची पोलिस आयुक्त कार्यालयात बैठक झाली.
यावेळी गुन्हे व वाहतूक विभागाच्या पोलिस आयुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केट पोलिस स्थानकाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजार पोलिस स्थानकाचे एसीपी चंद्राप्पा, कॅम्प पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी, खडेबाजार पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, पदाधिकार्‍यांसह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात उद्या समितीचा मोर्चा
उद्या सकाळी 11 वाजता सरदार मैदानातून मोर्चाला सुरुवात मराठीतून परिपत्रकांसाठी सोमवारी भव्य मोर्चा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm