उद्योग क्षेत्रातील बादशाह, Ray Ban च्या मालकांचं निधन;

उद्योग क्षेत्रातील बादशाह, Ray Ban च्या मालकांचं निधन;

belgavkar.com | belgaum | belgavkar

इटलीतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत होते दुसऱ्या स्थानी

इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि गॉगल निर्मिती क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे लिओनार्डो डेल वेचिओ यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. डेल वेचिओ अनाथालयात वाढले. पैशांच्या चणचणीमुळे त्यांना किशोर वयापासूनच काम करावे लागले होते. मात्र पुढे त्यांनी आपले चातूर्य आणि कौशल्याच्या जोरावर इटलीमध्ये गॉगल निर्मिती क्षेत्रात स्वत:चे साम्राज्य निर्माण केले. गॉगल्समधील जगप्रसिद्ध ब्रँड रे बॅन हे त्यांच्याच मालकीचे आहे. ते इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.
डेल वेचिओ यांचा जन्म 22 मे 1935 रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. आई-वडील नसल्यामुळे त्यांनी आपले बालपण अनाथालयात घालवले. तसेच किशोरवयातच त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. मात्र पुढे 1961 साली त्यांनी Luxottica नावाची स्वत:ची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीला ते गॉगल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सुटे भाग विकायचे. मात्र पुढे दशकभरानंतर त्यांनी Luxottica या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून स्वत: गॉगल्स निर्मिती करण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांच्या कंपनीचे उत्पादन फक्त इटलीपर्यंत सीमित होते. मात्र हळूहळू त्यांनी संपूर्ण युरोपातील बाजारपेठा काबीज केल्या. पुढे त्यांनी फॅशन डिझायनिंग ब्रँड अरमानीसह अनेकांशी भागिदारी केली. तसेच पुढे त्यांनी रे बॅन, पर्सोल, आणि ओक्ले अशा ब्रँड्सवर मालकी मिळवली. पुढे Luxottica या कंपनीने लेन्सक्राफ्ट, सनग्लास हट अशा कंपन्यांना खरेदी केले. परिणामी Luxottica कंपनीचा संपर्क थेट ग्राहकांशी होऊ लागला.
दरम्यान, डेल वेचिओ यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून इटलीमधील उद्योग क्षेत्रातील बादशाह हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

उद्योग क्षेत्रातील बादशाह, Ray Ban च्या मालकांचं निधन;
इटलीतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत होते दुसऱ्या स्थानी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm