बेळगाव : सौंदत्ती यल्लमा देवस्थानमधील भ्रष्टाचार रोखा

बेळगाव : सौंदत्ती यल्लमा देवस्थानमधील भ्रष्टाचार रोखा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर मनमानी कारभार सुरू झाला आहे. दर्शनाकरिता ते 100 ते 200 रुपये तसेच देवीचे थेट दर्शन घेण्याकरिता 500 रुपये आकारले जात आहेत. येथील देवीच्या दरबारात खुलेआम भाविकांची लुबाडवूक होत आहे. त्यामुळे येथील जय भीम ओम साई संघटनेच्या वतीने यल्लमा देवी डोंगरावरती सुरू असलेल्या प्रकाराबाबत निदर्शने करत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यल्लमा डोंगरात शौचालय, पिण्याच्या पाण्यासाठी तसेच राहण्यासाठी देखील पैसे द्यावे लागता. मात्र त्याच्या तुलनेत डोंगरावर कोणत्याही प्रकाराची स्वच्छता असलेली दिसून येत नाहीत.
आता दर्शनाकरिता देखील पैसे आकारले जात असल्याने आणि त्या बरोबरच कुंडातील पाणी आणण्याकरिता देखील 10-30 रुपये आकारले जात असल्याने भाविक आतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मोफत दर्शनाच्या रांगेमध्ये दुसर्‍या नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना दर्शन दिले जाते. त्यामुळे रांगेत उभारलेल्या नागरिकांना त्या ठिकाणी तासन्तास थांबावे लागत आहे. याठिकाणी सुरू असलेला हा प्रकार लवकरात लवकर थांबवावा याकरिता जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
यल्लमा डोंगरावर येणारे नागरिक हे मध्यम कुटुंबातील आणि गोरगरीब कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांचे जीवन समस्यांच्या विळख्यातून जात असते. त्यातच यल्लमा डोंगरावर प्रत्येक ठिकाणी पैसे आकारले जात असल्याने हा भाविकांना लुटणारा प्रकार शासनाने वेळीच थांबवा, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : सौंदत्ती यल्लमा देवस्थानमधील भ्रष्टाचार रोखा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm