बेळगावात भरतीचे आयोजन - मराठा लाईट इन्फंट्री

belgavkar.com | belgaum | belgavkar

12 व 13 जुलै रोजी बेळगावच्या एमएलआयआरसी येथे डीएससी भरती रॅलीचे आयोजन

Defence Security Corps (DSC)

बेळगाव : रेग्युलर आणि टी. ए. कर्मचारी असलेल्या माजी सैनिकांसाठी सैनिक जनरल ड्यूटी (GD) आणि सैनिक क्लर्क (Clerk) जागांसाठी 12 व 13 जुलै 2022 रोजी बेळगावच्या एमएलआयआरसी येथे डीएससी भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये नोकरी केलेले उमेदवार उपस्थित राहू शकतात. पात्रता असणार्‍या उमेदवारांनी रेजिमेंट सेंटर येथे 12 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.
पात्रता : नोकरी सोडताना वागणुकीचा शेरा ‘एक्झेंप्लरी किंवा व्हेरी गुड’ असा असावा. शिस्त-भरतीसाठी येणार्‍या ईएसएमच्या अर्जात दोनपेक्षा जास्त लाल शाईचे शेरे, आर्मी ऍक्ट से. 34, 35, 36, 37 आणि 41 (2) खाली शिक्षा, मागील पाच वर्षात आर्मी सेक्शन 48 अंतर्गत शिक्षा किंवा लाल/काळे शेरे, सेवेच्या शेवटच्या तीन वर्षात लाल शाईचा शेरा, उमेदवारांनी या आधी किमान पाच वर्षांची कलर सर्व्हिस झालेली असली पाहिजे. निवृत्त होऊन दोन वर्षांच्या आत पुर्नभरतीची तारीख असली पाहिजे, वैद्यकीय श्रेणी, रोप-एक असायला हवे, सेवेतून डिस्चार्ज होण्याचे कारण प्रतिबद्धता अटींची/भरतीच्या अटींची पूर्तता किंवा व्यक्तीच्या विनंतीवरून, शिक्षण-मॅट्रिक आणि पुढे नॉन मॅट्रिक असेल तर एसीई 3, वय-सोल्जर जीडीसाठी कमाल 46, सोल्जर क्लार्कसाठी कमाल 48 वर्षे असली पाहिजेत.
डिस्चार्ज पुस्तकाची मूळप्रत, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, राज्य अधिकृत अधिकार्‍यांकडून घेतलेले जातीचे प्रमाणपत्र, राज्य अधिकृत अधिकार्‍यांकडून घेतलेले डोमिसाईल प्रमाणपत्र, गावच्या सरपंचाकडून किंवा पोलीस पाटलांकडून सही, शिक्का आणि जन्मतारीख असलेले वर्तणूक प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र जारी केलेल्या तारखेपासून सहा महिन्यांपर्यंतच वैध असते. वर्तणूक प्रमाणपत्राच्या मागील बाजूस कुटुंबाचा फोटो, सर्वांची नावे, नाते आणि जन्मतारखेसह गाव सरपंच किंवा अधिकृत अधिकारी यांचा शिक्का आणि सही असली पाहिजे, आर्मी गुप इंश्युरेन्स सर्टिफिकेट, सर्व मुळ प्रमाणपत्रांचे 2 झेरॉक्स संच (प्रमाणित), अलीकडचे 15 पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो, एसपीकडून सही केलेले पडताळणी प्रमाणपत्र, पीपीओ, एटीसी (टीए कर्मचार्‍यांसाठी फक्त), वरील पात्रता असणार्‍या उमेदवारांनी रेजिमेंट सेंटर येथे 12 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात भरतीचे आयोजन - मराठा लाईट इन्फंट्री
12 व 13 जुलै रोजी बेळगावच्या एमएलआयआरसी येथे डीएससी भरती रॅलीचे आयोजन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm