बेळगावच्या दोघांना अटक

बेळगावच्या दोघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : धारवाड, हुबळी, संकेश्वरसह महाराष्ट्रातील कोल्हापूर, गडहिंग्लज परिसरात धुमाकूळ घातलेल्या दोघा चोरट्यांना हुबळी येथील गोकुळनगर रेल्वे पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी अटक केली. गेल्या आठवड्यात हुबळी पोलिसांनी नितेश ऊर्फ दीपू जगन्नाथ दापळे व रोहित ऊर्फ पिल्ल्या शंकर (दोघेही रा. बेळगाव) या दोघांना अटक केली. त्यांची कसून चौकशी त्यांच्याकडून 150 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक कार आणि एक दुचाकी जप्त केली आहे. या दोघा चोरट्यांनी पाच ठिकाणी चोरी केली होती.
चोरी करण्यासाठी बेळगाव येथील टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतून दुचाकी चोरली होती. त्यानंतर या चोरट्यांनी हुबळी, धारवाड, कोल्हापूर, गडहिंग्लज आणि संकेश्वर येथे चोर्‍या केल्या होत्या. याची माहिती हुबळी येथील गोकुळनगर रेल्वे पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची यांना मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखालील पीएसआय विश्वनाथ एम. ए., प्रशिक्षणार्थी पीएसआय मंजुनाथ एम. पी., पोलीस हवालदार एन. आर. निलगार, आर. आर. हुकनदवर, बी. एफ. बेळगावी, जी. एस. मत्तीगट्टी, एल. व्ही. नायक. के. एस. गौरी, एम. एम. हिरेमठ, नागभूषण पुजार, महेश बेन्नूर यांनी ही कारवाई केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावच्या दोघांना अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm