belgaum-immediate-transfer-of-officers-who-have-been-stationed-for-more-than-five-year-belgaum-202206.jpg | बेळगावातील पोलिस अधिकाऱ्यांची तातडीने बदली करा | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगावातील पोलिस अधिकाऱ्यांची तातडीने बदली करा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गेल्या काही वर्षापासून बेळगाव जिल्ह्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, त्याची सीबीआय चौकशी करावी. राजकीय दबावातून असे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, तरी पाच वर्षांपेक्षा अधिक वर्षे ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराचे संघटनेचे अध्यक्ष सुजीत मुळगुंद, म. ए. समितीचे युवाध्यक्ष शुभम शेळके, ॲड. नागेश सातेरी, आपचे राजकुमार टोपण्णावर, काँग्रेसचे ॲड. आर. पी. पाटील, ॲड. सुरेंद्र उगारे, जेडीएसचे मुक्तार इनामदार, सरला सातपुते, ॲड. गंगाधर मठ, ॲड. बी. पी.जेवणी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.