Indian Rupee : रुपयाची ऐतिहासिक घसरण, इतके रुपये होण्याची शक्यता

belgavkar.com | belgaum | belgavkar

रुपयात सुरू असलेली घसरण आजही कायम

कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अधिक $ मोजावे लागतील. त्यामुळे महागाई वाढण्याची भीती

मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 48 पैशांनी घसरून 78.85 या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला. चलन बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, प्रति डॉलर रुपयाचा दर 80 रुपये होण्याची शक्यता आहे. या वर्षात रुपयांत आतापर्यंत सहा टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. जून महिन्यातच रुपयाच्या दरात 1.5 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने गुंतवणूक काढली जात आहे. त्यामुळे रुपया बुधवारी सकाळच्या सत्रात 11 पैशांनी घसरला. आंतरबँक परदेशी चलन विनिमय बाजारातील रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आणखी कमकुवत झाला. त्यानंतर यात आणखी घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत हा रुपयांचा आतापर्यंतचा नीचांकी दर आहे. 
दरम्यान, शेअर बाजारातील प्राथमिक आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी 1,244.44  कोटींच्या शेअरची विक्री केली. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.88 टक्क्यांनी घसरून USD 116.94 प्रति बॅरल झाले. दरम्यान, सहा चलनांच्या बास्केटच्या तुलनेत डॉलरची स्थिती दर्शवणारा निर्देशांक 0.08 टक्क्यांनी घसरून 104.42 वर व्यवहार करत होता. भारत कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात करतो. भारतातील इंधनाची गरज भागवण्यासाठी 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. सरकारी इंधन कंपन्यांकडून डॉलरमध्ये कच्च्या तेलाची खरेदी केली जाते. रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्यास भारतीय इंधन कंपन्यांना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अधिक डॉलर मोजावे लागतील. त्यामुळे महागाई वाढण्याची भीती आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Indian Rupee : रुपयाची ऐतिहासिक घसरण, इतके रुपये होण्याची शक्यता
रुपयात सुरू असलेली घसरण आजही कायम

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm