बेळगाव : दंड न भरल्यामुळे दुचाकीस्वाराला मारहाण

बेळगाव : दंड न भरल्यामुळे दुचाकीस्वाराला मारहाण

belgavkar.com | belgaum | belgavkar

पोलिसांनी रस्त्यात उभे राहून वाहनांची तपासणी करणे थांबवावे - राज्य पोलीस महासंचालक

बेळगाव : दुचाकीस्वाराने दंड भरला नाही म्हणून एका पोलीस अधिकार्‍याने त्या युवकाला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे घडला आहे. या प्रकारामुळे पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे बराच उशीर या परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर काही तरुणांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. तपासणीच्या नावाखाली पोलीस वाहनचालकांना दमदाटी करत आहेत. मनमानीपणे दंड वसूल करत आहेत. बर्‍याचवेळा काही जणांकडे पैसे नसतात. त्यामुळे त्यांना तो दंड भरणे अशक्य असते. मात्र पोलीस दंड भरा अन्यथा वाहन जप्त करू, तसेच अरेरावी करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. एकेरी शब्दात बोलले जात आहे. अशा तक्रारी वाढल्या आहेत.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पोलिसांनी रस्त्यात उभे राहून वाहनांची तपासणी करणे थांबवावे. कारण भररस्त्यात वाहने थांबवून तपासणी करणे हे योग्य नाही. याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालक प्रविण सूद यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार महासंचालकांनी रहदारी पोलिसांना याबाबत आदेश दिले होते. तरीदेखील वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी चौकाचौकात केली जात आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला तसेच महासंचालकांच्या सूचनेला बेळगावमधील रहदारी पोलिसांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काहीवेळा वाहनचालकाकडे पैसेच नसतात. त्यामुळे त्यांना पावती देणे गरजेचे आहे. पावती दिली तर ते न्यायालयात जाऊन दंड भरू शकतात. मात्र आता रस्त्यावर उभे राहून सुरू असलेली दादागिरी अनेकांना त्रासदायक ठरत आहे. तेव्हा तातडीने संबंधित पोलीस अधिकार्‍यांना वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सूचना करावी, अशी मागणी होत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : दंड न भरल्यामुळे दुचाकीस्वाराला मारहाण
पोलिसांनी रस्त्यात उभे राहून वाहनांची तपासणी करणे थांबवावे - राज्य पोलीस महासंचालक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm